काय सांगता? राहुल गांधीं स्वतःची कार चालवत नाहीत तर...

Update: 2023-01-01 13:17 GMT

 सध्या देशात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा सुरु आहे. या यात्रेत कधी राहुल गांधीयांना कपड्यांवरून टार्गेट केलं जातंय तर कधी शूज वरून.. इतकंच काय त्यांना ज्या प्रकारे मुली भेटत आहेत भेटल्यानंतर त्या त्यांचा हात पाहता घेत आहेत त्यांना प्रेमाने चुंबन देत आहेत यावरून देखील त्यांना बऱ्याच प्रमाणावर ट्रोल केले गेलं. यावर त्यांनी अनेकदा त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिल आहे या सगळ्या चर्चा सुरु असताना राहुल गांधी यांच्या राजकीय असुध्याच्या पाहीकडे त्यांना कोणत्या आवडी आहेत त्यांना कष्ट रस आहे तुम्हाला माहित आहे का? तर या सगळ्या विषयी त्यांना एक Youtube चॅनेल चालवणाऱ्या युटूबरने प्रश्न विचारले आहेत. त्यात त्याने त्यांच्या आवडीच्या गाड्या कोणत्या, त्यांना कोणती गाडी चालवायला आवडते? इतकाच काय त्यांना बाइक व कार मधील किती माहिती आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.. एक गोष्ट ऐकून तुम्हाला देखील आश्यर्य वाटेल की राहुल गांधी स्वताची गाडी नाही ते त्यांच्या आईची गाडी वापरतात.. तर राहुल गांधी कोणती गाडी वापरता व त्यांना गाड्यांची आवड आहे का? काय म्हणाले आहेत ते पहा...

तर मुलाखतकाराने त्यांना असा प्रश्न विचारला की, तुमच्या जवळ कोणत्या गाड्या व बाईक आहेत? लँड क्रुझर ही गाडी तुम्ही वापरता का? तर यावर राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले की, खरं तर माझ्याकडे एकही गाडी नाही. मी माझ्या आईची CRV चालवतो. मला गाड्यांमध्ये कधीच रस नव्हता. पण मला गाडी चालवण्यात रस असल्याचं ते म्हणाले.. त्यांच्याकडे असलेल्या बाइक विषयी सुद्धा ते या मुलाखतीत बोलले आहेत.. ''माझ्याकडे मोटार बाईक आहे. मला मोटर बाईकमध्ये रस नाही, पण मला ती चालवायला आवडते.'' मला गाड्यांमधील सगळं समाजात असं म्हणत त्यांनी मुलाखतकाराला मला गाड्यांमध्ये रस नसला तरी मला त्या संदर्भात सर्व माहिती आहे तू माझ्याशी गाडी, इंजिन बद्दल बोल. मी ९०% गोष्टी बरोबर सांगू शकतो. मी गाडी दुरुस्त करू शकतो असं म्हंटल व त्यानंतर ही मुलाखत अत्यंत रंजक आहे.. राहुल गांधी यावेळी म्हणाले की, मला चालायला आवडते मला हवा, पाणी, जमीन आवडते. फक्त चालायला नाही तर मला वेगाने चालायला आवडते. गाडीविषयी बोलताना ते म्हणतात की, मला जुनी लॅम्ब्रेटा आर-१ आवडते. RD-350 ला प्राधान्य दिले जाते. या गाडीला दोन स्ट्रोक आहेत. ती धोकादायक आहे कारण ती काही वेळ काही करत नाही आणि अचानक ती पळून जाते. Aprilia RS-250 बाइक हे माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. लंडनमध्ये शिकत असताना मी ते चालवत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे...

Tags:    

Similar News