शिवसेनेचे विभाजन होऊ देऊ नका...

Update: 2022-07-22 08:20 GMT

''न्यायालयाच्या निकालात एक जिंकतो व एक हारतो पण वेळ अजुनही गेलेली नाही'' असं म्हणत आज पुन्हा शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिंदे-ठाकरेंना चर्चा करण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील बंड केले. त्याचसोबत अनेक स्थानिक कार्यकर्ते सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे यांच्यात दिवसेंदिवस हि दरी वाढत असताना दीपाली सय्यद या मात्र वारंवार शिंदे-ठाकरेंना एकत्र आन्यायसाठी प्रयत्न करत आहेत.

दीपाली सय्यद मागील अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यानंतर पुढील दोन दिवसात या दोघांची भेट होणार असल्याचं त्यांनी म्हंटल होतं. त्यानंतर त्यांनी केलेल्या या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते. हे सगळं झालं असलं तरी दीपाली सय्यद या शिंदे व ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करण्याकरीत वारंवार प्रयत्न करताना दिसत आहेत. आज त्यांनी ट्विट करत शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडुन शिकावे, तसेच न्यायालयाच्या निकालात एक जिंकतो व एक हारतो पण वेळ अजुनही गेलेली नाही असं म्हणत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्याची विनंती केली आहे.

Tags:    

Similar News