Dhanjay Munde Rape case : "समर्थन करु शकत नाही" पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावर आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजकीय विरोधक असलेल्या पंकजा मुंडे यांनी यावर अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती.
मात्र, आज औरंगाबाद येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पंकजा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली...
'मला वाटतं तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. तरीही यावर परत परत बोलावं लागू नये... म्हणून आता तुम्ही सर्वच जण आलाच आहात तर... सैद्धांतीक दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करु शकत नाही. तरीही एखाद्या कुटुंबाला, कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही. ज्या मुलांना त्रास होतो. मी महिला बाल कल्याण मंत्री राहिलेली आहे. आणि मी एक साहजिक नातं म्हणून नाही... तर एक महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशिलतेने पाहते. हा विषय कोणाचाही असता. तरी त्याचं मी कधीही राजकीय भांडवलं मी केलं नसतं आणि करणारही नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, या विषय संवेदनशिलता दाखवावी.
अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.