आणखीन कोण-कोण भाजप व शिंदे गटाच्या संपर्कात?

Update: 2022-07-03 13:55 GMT

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटातून मंत्री पदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण ते आईच्या आजारपणामुळे या सगळ्या घ़डामोडींपासून दूर असल्याचे सांगितले गेल्याने या चर्चेवर पडदा पडला आहे. पण विधानसभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे नवीनच चर्चा सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी रात्री भेट घेतली होती. यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. याच संदर्भात बोलताना धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना अनेकजण पुढच्या दाराने तर काहीजण मागच्या दाराने भेटल्याचा गौप्यस्फोट केला. मिलिंद नार्वेकर यांनीही फडणवीस यांची मागच्या दाराने भेट घेतल्याचे आपल्याला आदित्य ठाकरे यांच्याशी गप्पा मारताना कळले, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आता धनंजय मुंडे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमधील आणखी काही लोक भाजप किंवा शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News