धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना प्रश्न, का संतापले धनंजय मुंडे पहा..
राज्याच्या राजकारणात मुंडे बहिण-भाऊ काही ना काही कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. मग कधी ते त्यांच्या एकमेकांमधील वादांमुळे तर कधी ते बहिण भावाच्या नात्यामुळे. आता पुन्हा एकदा मुंडे बहिण-भाऊ चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर मतदारसंघातील कामांवरून टीका केली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंडे बहीण भावांमध्ये ठिणगी पडली...
धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले..
केंद्रात आणि राज्यात सरकार असताना रेल्वे डब्याचा प्रकल्प लातूरला कसा गेला? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना विचारला. एवढ्यावरच धनंजय मुंडे थांबले नाहीत पुढे पंकजा मुंडे यांचं नाव न घेता त्यांनी सिरसाळ्यात विकासाची साधी एक वीट तरी आणली का? मी विकास करताना कोणाकडे विरोधक म्हणून बघत नाही. विकास करताना मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो असं म्हणत टोला लगावला..
परळी तालुक्यातील सिरसाळा गावी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. त्यांच्या भाषणात पुढे ते म्हणाले की, माझ्या जीवनामध्ये एखाद्याला मी विरोध केला असेल तो विरोध सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केला असेल, पण राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मी कोणाच्या पटीत वार केला नाही. ज्याला कोणाला वार करायचा असेल तर छातीवर झेलण्याची माझी तयारी आहे. पाठीत वार करायचं काहीजणांनी बंद करावे असा टोला देखील त्यांनी लगावला..