श्रेयवादावरून पुन्हा धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा, म्हणाले...
परळी नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा बहीण पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. परळीत आंदोलन करण्याकरिता भाजपला माणसं मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसला पुढे केले जातं. तर ज्यांनी 5 वर्षा पर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सत्ता भोगली, दोन विभागाचे मंत्रिपद मिळाले. त्यांच्या काळात तीन वेळा रस्त्याचे भूमिपूजन केले. पण मी आमदार होईपर्यंत रस्ता झाला नाही. असं म्हणत मुंडेंनी थेट पंकजा मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे.