कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ, लोकहो सावध व्हा

उपमुख्यमंत्री म्हणतायत मनाची तयारी करुन ठेवा

Update: 2021-02-15 12:15 GMT

कोरोनावरील लसीकरण सुरू झालेले असताना राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे सरकारला कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. नागरिकांना त्रास देण्याचा हेतू नाही पण नागरिकांनी तयार राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. जानेवारीचा अखेरचा आठवडा आणि फेब्रुवारी महिन्याच्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या पुन्हा वाढली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. रात्री मुंबईला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. कुणाला त्रास देण्याचा विचार नाही पण लोकांनी मानसिकृष्ट्या तयार रहावे असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.


Tags:    

Similar News