"आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात दिसावे.." शिवसेना नेत्याचे ट्विट

Update: 2022-07-17 04:16 GMT

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता एकनाथ शिंदे धडाधड निर्णय घेत आहेत. तर तिकडे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. या सगळ्यात शिवसैनिक मात्र या दोघांनी एकत्र यावर यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद या देखील ठाकरे-शिंदे एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी एकत्र यावे यासाठी दीपाली दय्यद यांनी तर मागच्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावं यासाठी त्या मध्यस्थीची भूमिका बजावत आहे.




 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे आता दिपाली सय्यद करत असलेल्या मध्यस्थीला यश येणार का? अशी चर्चा आहे. या दोघांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटला आहे की, लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील.




 



अशाप्रकारे दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एक व्हावेत व पुन्हा एकदा आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात दिसावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News