शिवसेनेचे (Shivsena )एकनिष्ठ मंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातील नाराज आमदारांना घेऊन बंड केले आहे. त्यामुळे भाजपच्या राजकारणाला उत्तर म्हणून निर्माण झालेले महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात एकनाथ शिंदे यांना एकट्याला यश आले का, अशी चर्चा सुरू झाली आहे, की यामागे उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांचीच खेळी आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे. हे सगळं होत असताना शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एक ट्विट करत, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी आपले मत शिवसेनेला कायम राहील असं म्हंटल आहे.
माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 22, 2022
आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल. @ShivSena
दरम्यान आता पक्षाविरुद्ध बंड केलेल्या आमदारांवर शिवसेनेने (40MLAS) कारवाईची तयारी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत वर्षा निवासस्थानी सकाळपासून बैठका घेतल्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक ५ वाजता बोलावण्यात आली आहे. तसेच सर्व बंडखोर आमदारांना पक्षाने मेल करुन ते पत्र पाठवले आहे. या पत्रात जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत त्यांना भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेचे किती आमदार उपस्थित राहतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.