राज्यात सत्ता बदल झाला आहे.अनेक घटना घडल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण अजून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच सरकार चालवत आहेत.या परिस्थितीवर सोलापुरात भाष्य करताना प्रणिती शिंदे यांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
त्याचबरोबर "बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले तेंव्हा त्यांना तिथे काय झाडी ,काय डोंगार ,काय हॉटेल सगळंच ओके मध्ये झालं आहे.पण इकडे महाराष्ट्रात मात्र नॉट ओके झालं आहे",असे परखड मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
"एकीकडे केंद्र सरकारच्या अपयश आणि चुकीचा धोरणामुळे महागाईचा भडका उडत आहे. त्याचा फटका गृहिणींना होत आहे. नागपंचमी सारख्या सणासुदीला पुरणपोळी बनवायची की नाही हा प्रश्न त्यांना पडत आहे. गहू, तेल, गोड ,डाळी प्रचंड महागल्या आहेत .तेव्हा पुरणपोळी बनवून कुटुंबीयांना खाऊ घालायची कि नाही याचा दहा वेळा विचार करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य जनता आज नॉट ओके मध्ये आहे त्याची काळजी अस्थिर सरकारला कसे राहणार?असं टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे .