पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची TMC अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. पक्षाचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी ही माहिती दिली. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बुधवारी पाच वर्षांनंतर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या, ज्यामध्ये ममता यांची अध्यक्षपदी निवड झाली. ममतांच्या बाजूने 48 समर्थकांनी अर्ज सादर केले. तर अध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवार उभा राहिला नाही.
तत्कालीन पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमेंद्र नाथ मित्रा यांच्याशी राजकीय मतभेदांमुळे ममता बॅनर्जी यांनी 1997 मध्ये पक्ष सोडला आणि 1998 मध्ये मुकुल रॉय यांच्यासोबत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. गेल्या वर्षी मे महिन्यात 294 पैकी 213 जागा जिंकून TMC सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आली आहे.