अखेर शिवसेना-मनसे एकत्र....
मनसे नेते राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठींबा दिला असला तरी त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने भूमिका घेतली आहे.. आरे कारशेडबाबत पुनर्विचार करण्याबाबत त्यांनी पत्र लिहीले आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.;
एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान ठाकरे बंधूंचे एकमत झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यंमत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला होता. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने उध्दव ठाकरे सरकारचा मेट्रो कारशेडसंदर्भातील निर्णय रद्द केला. उध्दव ठाकरे सरकारने आरे कारशेडला होणारा विरोध लक्षात घेता कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करत पुन्हा कारशेड आरे येथेच करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार विरोध दर्शवला. तर मुंबईकरांवर अन्याय करू नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता आरे कारशेडच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र येत शिंदे-फडणवीस यांनी आरे करशेड बाबत घेतलेला निर्णय हणून पाडू अशी भावना मनसैनिक व शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
मनसे नेते राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठींबा दिला असला तरी त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत पुनर्विचार करण्याबाबत पत्र लिहीले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आरे कारशेडबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कित्येक दिवसानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या ठाकरे घराण्यातील दुसऱ्या पिढीचे एकमत झाले आहे. काय आहे अमित ठाकरे यांची पोस्ट पहा..