कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचा संताप..

Update: 2021-12-17 06:30 GMT

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी महिलांबाबत अत्यंत लाजिरवाणे वक्तव्य केले आहे. गुरुवारी विधानसभेत बोलताना त्यांनी महिलांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केले. 'एक म्हण आहे की, जेव्हा बलात्कार होणार असेल तेव्हा झोपा आणि मजा करा.' आशा प्रकारचे बेताल वक्त्याव्य आमदार कुमार यांनी केलं. इतकंच नाही तर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या विधानावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी ते चक्क हसले होते.

या सर्व प्रकारावर महाराष्ट्र भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत, लोकशाहीचे पवित्र मंदिर विधानभवनाचा आब घालवणारी घटना कर्नाटक विधानसभेत घडलीय महिलांप्रती पुरूष लोकप्रतिनिधींच्या भावना काय आहेत हे दिसून आलं…बोलणा-यासोबतच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून हसणारे पण दोषी बेताल…बेजबाबदार..असंवेदनशील पुरूषीवृत्ती कडूनच महिलांचे रक्षण करण्याची गरज आल्याच म्हंटल आहे.

Tags:    

Similar News