ठाकरेंच्या मुलाखतीवरून चित्रा वाघ आणि सचिन सावंत यांची जुगलबंदी
काय ते प्रश्न..काय ती उत्तरं..काय ती घरातल्या घरातली मुलाखत..कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के…चित्रा वाघ यांच्या या टोल्याला सचिन सावंतांची प्रतिक्रिया ...;
शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच सामनाला मुलाखत दिली. ही मुलाखत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. हिंदूत्वाच नेतृत्व म्हणत कौतुक झाल. तर दै सामना हे ठाकरेच घरचच माध्यम आहे. असं म्हणत काही विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. यावर काँग्रेस, भाजपांच्या नेत्याने प्रतिक्रीया दिल्या आहेत. पाहूयात या प्रतिक्रीया काय आहेत..
भाजपचे महिला नेत्या चित्रा वाघ यांनी ट्टिटवर प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्यात की काय ते प्रश्न..काय ती उत्तरं..काय ती घरातल्या घरातली मुलाखत..कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के…चित्रा वाघ यांच्या या टोल्याला सचिन सावंतांची प्रतिक्रिया ...
" असं म्हणत खोचक टोला लगावला. तर या ट्टिटला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस @Dev_Fadnavis आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे @mieknathshinde यांना टॅग केल आहे .
https://twitter.com/ChitraKWagh/status/1551802080184221696?s=20&t=OgGAjQ-qzYTmirdO7_PTSQ
मी फिक्स मॅच बघत नाही, मी लाईव्ह मॅच बघतो अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिलेल्या प्रतिक्रीयाचे चित्रा वाघ यांनी पुन्हा ट्टिट केले म्हणाल्या एक ही मारा लेकिन सॉलिड मारा…😂🤣 अस ट्विट चित्रा वाघ यांनी केल
https://twitter.com/ChitraKWagh/status/1551901476171423744?s=20&t=OgGAjQ-qzYTmirdO7_PTSQ
दरम्यान यावर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.
सचिन सावंत म्हणाले, "बरोबर आहे, मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी. काय ते देशहिताचे प्रश्न, काय ती जनहिताची उत्तरे, काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत, राष्ट्रीय कार्यक्रम एकदम ओक्के."
सचिन सावंत यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीचा एक भाग आहे. यात अक्षय कुमार मोदींना तुम्ही आंबा खाता का? खात असतील तर कापून खातात की चोखून खातात, असा प्रश्न विचारला आहे. यावर मोदी हसताना दिसत आहे.
बरोबर आहे, मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी.....
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 27, 2022
काय ते देशहिताचे प्रश्न
काय ती जनहिताची उत्तरे
काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत
राष्ट्रीय कार्यक्रम एकदम ओक्के..... https://t.co/R7UJWylbZB pic.twitter.com/yR1ParsLZC