"तुम्ही करा रे कितीही हल्ला,लय मजबूत भिमाचा किल्ला"; समीर वानखेडेंच्या समर्थनात उतरल्या चित्र वाघ

Update: 2021-10-27 04:39 GMT

NCB अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर मलिक यांच्याकडून वानखेडेंवर रोज नवनवीन गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ समीर वानखेडे यांच्या समर्थनात उतरल्या आहेत. तुम्ही करा रे कितीही हल्ला,लय मजबूत भिमाचा किल्ला, असं म्हणत त्यांनी वानखेडे यांच्या समर्थनात ट्विट केलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "तुम्ही... त्याला धमक्या दिल्या,त्याला अपमानीत केलं,त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या,त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला, तरीही तो डगमगला नाही कर्तव्य बजावत राहीला...तुम्ही करा रे कितीही हल्ला,लय मजबूत भिमाचा किल्ला",असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मालिकांनी आज पुन्हा एक नवीन आरोप करत समीर दाऊद वानखेडे नावाचे निकाह नामा ट्विट केलं आहे.

समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुद्धा सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनात भाजप नेते उतरतांना दिसत आहे.

Tags:    

Similar News