नावसहित स्क्रीनशॉट शेअर करत चित्रा वाघ यांनी केली कारवाईची मागणी...

Update: 2022-05-15 10:45 GMT

वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे यांना काल अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना आज सकाळी पोलीस कोठडी देखील सुनावले आहे. हे सगळं होत असताना सध्या समाजमाध्यमांवर मात्र केतकी चितळे यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीका केली जात आहे. याचवरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी, टीका करणाऱ्यांवर कारवाई करणार करावी असं त्यानी महाराष्ट्र पोलीस व सायबर पोलिसांना टॅग करून म्हणलं आहे.

चित्रा वाघ यांनी एक ट्विट केला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, "केतकी चितळेवर कारवाई झाली. आता त्यांच्याबरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ, उघड-उघड जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रंरागिनीवर देखील रीतसर गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करावी. कायदा सर्वांना समान असतो असं म्हणत त्यांनी @DGPMaharashtra आणि @MahaCyber1 यांना टॅग केलं आहे.


नावसहित स्क्रीनशॉट शेअर करत चित्रा वाघ यांनी केली कारवाईची मागणी...

नेमकं काय आहे प्रकरण?

शुक्रवारी अभिनेत्री केतकी चितळेने एक वादग्रस्त पोस्ट केलीये. या वेळी तिने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणारी काव्यरचना पोस्ट केलीये. ही काव्यरचना तिने लिहीलेली नसुन कुणी ऍड. नितिन भावे यांनी लिहीली आहे.

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

काव्य रचना करणाऱ्या नितिन भावे यांनी यात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांप्रमाणे त्यांचंच नाव घेऊन सुरूवात केलीये. शब्दशः सार काढायला गेलो तर हा निघतो की, तुकाराम महाराज पावारांना सांगतात की तोंडाचा फवारा उडवू नको, आता या काव्य रचनेतील पवार कोण हे आपल्याला पुढील वर्णनावरून स्पष्ट होतं. तुर्तास पुढील ओळींचा अर्थ पाहुयात. वयाची ऐंशी ओलांडली आहे आता खुप जगलात नरक आपली वाट पाहत आहे. सारे शिलेदार पडले आता फक्त सुप्रिया सुळे आणि सतरा वेळा तोंडातून लाळ गळत असते.

Full View

शरद पवारांचा समर्थ रामदास स्वामींना असलेला विरोध जगजाहीर आहे त्यावरून बोलत समर्थ रासदास स्वामी हे शरद पवारांच्या बापाचेही बाप आहेत असं म्हटलं आहे. शरद पवार हे ब्राम्हणांचा मत्सर करतात म्हणुन त्यांची तुलना डासाशी केली गेली आहे. शरद पवार आपल्या पापांचा घडा भरला आहे गप्प बसा नाही तर राडा होईल असा धमकीवजा इशाराच देण्यात आला आहे. फुकटचा पैसा खाऊन पवारांचं तोंड हे वाकडं झालं असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे लबाडांचे लबाड असल्याचं या अभंग रचनेत म्हटलं आहे.

हा वादग्रस्त अभंग पोस्ट करून अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेच पण तिच्यावर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चौफेर टीका करत आहेत. या सगळ्या टीका टिप्पणीला केतकी कशी सामोरी जाते आणि शरद पवार यावर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News