ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडत असताना, विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे भाजपच्या 12 आमदारांच एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत, 'हिसाब बराबर होंगा' असा टोला लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, 'संविधान बचावचे नारे देणारेचं संविधानाच, लोकशाहीचा गळा घोटत आहेत. ठाकरे सरकारने १२ जणांचं निलंबन करून मुस्कटदाबी चालवलीये, त्यामुळे राज्याच्या जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल, कारण ते जनतेचा आवाज सभागृहात उठवतं होते. त्यामुळे लक्षात ठेवा,हर एक का दिन आता है...हिसाब बराबर होगा,असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला.