सावित्रीच्या लेकींसाठी ठाकरे सरकार महाराष्ट्र बंद कधी करणार; पुण्यातील घटनेवरून चित्रा वाघ कडाडल्या
पुणे येथे एका कबड्डीपट्टू (kabaddi players) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून (one-sided love affair) कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये (bibwewadi) येथे घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत सावित्रीच्या लेकींसाठी ठाकरे सरकार महाराष्ट्र बंद कधी करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात.. कोयत्याने वार करून खून, टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने, कायदा सुव्यवस्था वार्यावर पोलिस कायदे कागदावर.. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ??" असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी सरकारला लावला आहे.
अतिशय भयानक ?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2021
काय चाललयं पुण्यात
कोयत्याने वार करून खून
टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने
कायदा सुव्यवस्था वार्यावर
पोलिस कायदे कागदावर
महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ?? @CMOMaharashtra pic.twitter.com/vXLF08U5jY
गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार आणि एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असतांना पाहायला मिळत आहे. मात्र सरकार आणि पोलिसांकडून याची गंभीर दखल कधी घेतली जाणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे.