राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, अशी घोषणा सभागृहात केली होती. मात्र 31 तारीख उलटूनही MPSC च्या रिक्त जागा भरण्याबाबत कोणतेही घोषणा झाली नसल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तसेच "दादा…….क्या हुवा तेरा वादा" असा खोचक टोलाही लगावला आहे.
पुण्यातील स्वप्नील लोणकरच्या आत्महत्यानंतर राज्यातील MPSC च अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाले. त्यांनतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा सरकारवर निशाणा साधला. त्यामुळे राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, अशी घोषणा सभागृहात केली होती. पण 31 जुलै उलटून ही रिक्त जागा भरण्याबाबत कोणतेही घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "मा.मुख्यमंत्री जी, मा.उपमुख्यमंत्री जी, स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला…. दादा.क्या हुवा तेरा वादा…" असा खोचक टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून MPSC मधून भरल्या जाणाऱ्या जागा रिक्त आहे. मात्र सरकारकडून त्या भरल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप असून, अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करण्यात आले. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचा पलीकडे काहीच मिळत नसल्याचे आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.