"संजय राऊत आपला पुरुषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे"
सेना भाजप राडा, नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द सुरुच, चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका;
राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्यावरुन सामनातून भाजपवर केलेल्या टीकेमुळे दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर 'फटकार' मोर्चा काढला होता. यावेळी दोनही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि राडा झाला. प्रत्यक्ष मारामारी थांबली असली दोनही पक्षांच्या नेत्यांमध्ये अजूनही शाब्दिक युध्द सुरुच आहे.
'हिंमत दाखवतं सामनात अग्रलेख लिहून सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा. अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे,' असं आव्हान देतानाच चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 'सर्टिफाईड गुंड असो किंवा नॉन-सर्टिफाईड गुंड असो, त्यांना चार हात करायला महाराष्ट्रातील आम्ही जिजाऊंच्या लेकी तयार आहोत,' असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
त्यामुळे आता हा वाद कधी शांत होतोय हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.