"अब बात निकलही गई है तो दूर तलक जायेगी"
चित्रा वाघ यांचा सरकारला सुचक इशारा;
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने मोठा गदारोळ उडाला आहे. या पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा दावा केला आहे.
या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी "कुंपणच जर शेत खात असेल तर लोकांनी न्याय मागायचा कुणाकडे? अब बात निकलही गई है तो दूर तलक जायेगी" असं म्हटलं आहे.