ठाकरे सरकारमधील मंत्र्याची विकेट घेणाऱ्या, चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

Update: 2021-06-30 09:14 GMT

मुंबई: महिलासंबधीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने मोठी जवाबदारी सोपवली असून, त्यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन असा विश्वास चित्रा वाघ यांनी बोलावून दाखवला आहे.





तर, युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे 'भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी' म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.





 



चित्रा वाघ यांनी जवळपास 20 वर्षे राष्ट्रवादी पक्षात काम केलं. सत्ता नसतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर असताना महिलांच्या प्रश्नावरून तत्कालीन भाजप सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळायचं. परंतु 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्येही त्यांनी पूजा चव्हाण आणि वन विभागाच्या अधिकारी दिपाली चव्हाण प्रकरणात ठाकरे सरकारला अडचणीत आणले होते. त्यांच्या आक्रमक भुमिकेमुळे ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याला आपली खुर्ची गमवावी लागली असल्याचं सुद्धा बोलले जाते.

Tags:    

Similar News