राजकारणात अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात जातात खरे ,पण त्यामागची कारणे सुद्धा अनेक असतात . आता राजकीय नेत्यांची मने कधी बदलतील हे सांगता येत नाही. एखाद्या पक्षाला आपल्या कार्याने मोठं करणे आणि थोड्या वर्षाने काही कारणासाठी तोच पक्ष सोडणं आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं अवघड असू शकतं . पण गेल्या काही वर्षात आपण हे राजकीय डावपेच आपण पाहिले आहेत .
मागील वर्षी तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले . आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात या प्रकारे क्वचित घटना घडल्या आहेत . पण शिवसेनेत अजून एक नेते होते ते म्हणजे छगन भुजबळ,ज्यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना हा पक्ष सोडला . त्यांनी शिवसेना सोडण्याचे खरं कारण काय होतं ? याचा सुद्धा एक इतिहास आहे ...हाच किस्सा ऐका , राजकीय पत्रकार राही भिडे यांच्याकडून...