''देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले परंतु..'' चंद्रकांत पाटलांची प्रतिकिया
राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकही जाहीर झाली आहे. मात्र या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे.
राज्यात राज्यसभा निवडणूकीमुळे वातावरण तापले आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभुमीवर भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी बाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी पंकजा मुंडे यांच्या नावासाठी खूप प्रयत्न केले होते. पण त्यांच्याबाबत केंद्रीय संघटने विचार केला असेल कार्यकर्त्यांची नाराजी ही क्षणभराची असते.
यापुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये आम्ही कोरी पाकिटे असतो. त्यावर जो पत्ता दिला जातो तेथे आम्ही जातो. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5 उमेदवार पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घोषित केले आहेत. यामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कार्यकर्त्याने आपकी इच्छा व्यक्त करायचे असते त्या बाबतचा निर्णय ही संघटना घेतले असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.