भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कन्या विजयी

Update: 2021-10-06 10:25 GMT

राज्यातील सहा जिल्ह्या परिषद पोटनिवडणुकीचे ( Zilla Parishad by-election ) निकाल हाती आले आहेत. तर निकालात सर्वच पक्षातील अनेक नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बाजी मारली आहे. तर काहींना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कन्या धरती देवरे ह्या धुळे जिल्ह्यातील लामकानी जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत. 

धरती देवरे सुमारे 4 हजार 96 मतांनी विजयी झाल्यात. धरती देवरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. त्याआधी मागील निवडणुकीत त्या विनविरोध निडणून आल्या होत्या. सध्या धुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. 56 पैकी 27 जागा भाजपकडे आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसकडे 6 जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर भाजपला बहुमत मिळाले आहे.

Tags:    

Similar News