"कॅबीनेट मंत्र्यांनी आपलं अपयश लपवण्यासाठी लॉकडाउन जाहिर केलं"

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्यावर आरोप;

Update: 2021-02-25 09:48 GMT

अमरावतीच्या पालक मंत्री यशोमती ठाकुर यांनी कोरोना आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने ते लपविण्यासाठी चुकीच्या मार्गाने लॉकडाऊन केल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार राणा यांनी केला आहे. अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आलं. मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरल्याचं खासदार राणा यांनी म्हटलं आहे.

या लॉकडाउनमुळे अनेक सामान्य लोकांच्या हाताला काम नाही. त्यातही महावितरणचे कर्मचारी विजतोडणी करताहेत. लॉकडाऊन मध्ये काम नसतांना सामान्य नागरिकांनी वीजबिल भरायचं कुठून असा प्रश्न अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला. दरम्यान ज्या प्रमाणे एक दिवसात लॉकडाउन करण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला तसाच त्यांनी वीजबिल माफ करण्यात घ्यावा असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Full View


Tags:    

Similar News