Budget session : काँग्रेसच्या खासदार "रजनी पाटील"का झाल्या निलंबित?

Update: 2023-02-11 04:01 GMT

काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना उर्वरित अधिवेशनात आता सहभाग घेता येणार नाही आहे.अधिवेशनात आपली मते ठामपणे मांडणाऱ्या रजनी पाटील यांनी या निलंबनावर सुद्धा ठाम प्रतिक्रिया दिली आहे,"मी स्वातंत्र्यसैनिकाच्या घरातून येते ,त्यामुळे मला अधिवेशनसाठीच काय तर संपूर्ण टर्म निलंबित केलं तरी चालेल परंतु ज्या पद्धतीने भाजपने सभागृहात अपमान केलाय तो आम्ही सहन करणार नाही" असं खासदार रजनी पाटील म्हणाल्या आहेत


पण निलंबनाच कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते आणि त्याचवेळी हिंडेनबर्ग प्रकरणावरून मोदींविरोधात विरोधकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली आहे . आणि याचाच व्हिडिओ रजनी पाटील यांनी शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. खासदार रजनी पाटील या व्हिडिओ शूट करत असल्याचा समजताच राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनी कारवाईची मागणी केली होती .त्यानुसार राज्यसभा सचिवालयाने याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उर्वरित अधिवेशनात खासदार रजनी पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News