त्तर प्रदेश निवडणूकीत समाजवादी पक्षाने, भाजपने आपली पहिली यादी केली जाहीर

मायावतींच्या वाढदिवसानिमित्त बसपाची पहिली यादी जाहीर

Update: 2022-01-15 12:57 GMT

देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, गोवा, पंजाब या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणूकीत समाजवादी पक्षाने, भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली असून आता बसपा सुप्रिमो मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

ज्या विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत ते सर्व पश्चिम उत्तर प्रदेश किंवा ब्रज भागातील आहेत.

या सर्व जागांवरील निवडणूका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. बसपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये

शामलीमध्ये २ जागा, मुझफ्फरनगरमध्ये ६ जागा, मेरठमध्ये ६ जागा, बागपतमध्ये २ जागा, गाझियाबादमध्ये ४ जागा, हापूरमध्ये ३ जागा, गौतम बुद्ध नगरमध्ये ३ जागा, बुलंदशहरमध्ये ६ जागा, अलीगढमध्ये ७ जागा तसेच मथुरा येथील ५ आणि आग्रा येथील ९ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

ही यादी शेअर करतांना बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी

आम्ही 58 पैकी 53 जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित पाच उमेदवारांची नावे सुद्धा एक दोन दिवसात फायनल केली जातील.

यासोबतच, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता आमच्या पक्षाला पुन्हा एकदा सत्तेत आणेल अशी आशा मायावती यांनी जाहीर केली आहे.

Tags:    

Similar News