पश्चिम बंगाल भाजपच्या नेत्या महिला नेत्या कोकेनसह अटक
पश्चिम बंगाल भाजप युवा मोर्चाच्या महासचिव पामेला गोस्वामी यांना पोलीसांनी 10 लाख रुपयांच्या कोकेनसह अटक केली आहे..;
कोलकातामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना 100 ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आलं आहे. पामेला यांच्या सोबत त्यांचा मित्र प्रोबिर डे आणि सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. जप्त केलेल्या कोकेनची किंमत 10 लाख रुपये आहे.
पामेला गोस्वामी या आमली पदार्थांचे सेवन आणि व्यापारात गुंतल्या संशय न्यू अलीपूर पोलीसांनी व्यक्त केला आहे. तर अटक केरण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज (शनिवारी) न्यायालयात हजर केले जाईल. असं पोलीसांनी सांगीतलं.
पामेला या फक्त एक राजकारणी नसुन मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहेत. तर राजकारणात येण्याआधी त्यांनी एअरहोस्टेस म्हणूनही काम केले आहे.