अन्यथा विद्यार्थी मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाहीत: श्वेता महाले

Update: 2021-07-05 03:32 GMT

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नीलच्या आत्महत्येच्या बातमी नंतर MPSC करणाऱ्या विध्यार्थांमध्ये खळबळ उडाली आहे. तर यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा होत आहे. याच मुद्यावरून भाजपच्या आमदार श्वेता महाले ( Shweta Mahale ) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल तर ते मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशारा श्वेता महाले ( Shweta Mahale ) यांनी दिला आहे.

महाले यांनी ट्विट करता म्हंटलं आहे की, 'परीक्षेच्या तारखा जाहीर होत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नैराश्यात आहेत. अभ्यास करणाऱ्या आमच्या बांधवांना आत्महत्या करावी लागत असेल तर, ह्या वसुली सरकारला जड जाईल. असेच होत राहिल्यास विद्यार्थी राज्यात मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाहीत",असं महाले म्हणाल्या आहेत.



स्वप्नील याच्या आत्महत्या नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच सोशल मीडियावर या विद्यार्थ्यांचा सरकार विरोधात संताप पाहायला मिळतोय.

Tags:    

Similar News