शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला आहे: श्वेता महाले
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याच वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला असल्याची' जहरी टीका महाले यांनी शिवसेनेवर केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं.
यावर शिवसनेने उत्तर देताना, जर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray), मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?" असा सवाल उपस्थिती केला होता. एकीकडे हा वाद सुरु असतानाच, 'दोन्ही पक्ष कॉंग्रेसमुळे सत्तेत आहात याची आठवण करून देत असल्याचं कॉंग्रेस नेते राजू वाघमारे म्हणाले होते. या तिन्ही पक्षातील या वादावरून श्वेता महाले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'काल राष्ट्रवादी आणि आज काँग्रेस, आघाडीतील नेते दररोज ठरवून मुख्यमंत्र्यांचा जाहीर अपमान करत आहेत. सेनेनं मात्र सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला आहे, असा टोला श्वेता महाले यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये विविध मुद्यांवरून वाद पाहायला मिळत आहे. मात्र याचाच फायदा घेत विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.