"कारखान्यांसाठी तीन हजार कोटी देणारं महाभकास सरकार पूरग्रस्तांबाबतीत चालढकल करतंय"
राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. शकडो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्र्यांनी पाहणी दौरे केली असून, आणखीही सुरूच आहे. मात्र पूरग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याचे समोर आले आहे. यावरूनच भाजप आमदार श्वेता महाले यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणासाधला आहे.
श्वेता महाले यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "बुडीत साखर कारखान्यांसाठी तीन हजार कोटी तातडीने देणारे महाभकास आघाडी सरकार, आता अतिवृष्टी आणि महापुरातील आपदाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मात्र चालढकल करीत आहे.," अशी खोचक टीका महाले यांनी केली.
बुडीत साखर कारखाण्यांसाठी तीन हजार कोटी तातडीने देणारे महाभकास आघाडी सरकार, आता अतिवृष्टी आणि महापुरातील आपदाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मात्र चालढकल करीत आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 30, 2021
राज्यातील नुकसानग्रस्त भागात सत्तधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांचे नेते पाहणी दौरे करत आहे. मात्र अनेक भागात लोकांना दहा किलो गहू आणि तांदूळ व्यतिरिक्त अजून कोणतेही मदत पोहचली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.