भाजपच्या अतुल भातखळकरांचं डोकं फिरलय का?

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह ट्विट केले आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी व नंतर आपल्या मानसिक स्थितीची तपासणी करुन घ्यावी..;

Update: 2020-12-09 14:00 GMT

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झालेले असताना आणि देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना आता भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यामुळे या आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि आंदोलनातील नेत्यांना धमक्या देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. असेच एक धमकीवजा ट्विट भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या भूमिकेला विरोध करताना भातखळकर यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडल्या आहेत. त्यांनी एक ट्विट केले आहे, "

कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर...

ही दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करून मोदींना पंतप्रधान बनवले आहे, ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी."अशा आशयाचे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.


याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी भूमिका मांडली आहे.

मेधा पाटकर यांच्यावर अतुल भातखळकर यांनी केलेली टीका ही अत्यंत खालच्या पातळीवरची असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतंय. विरोधकांचाही सन्मान ठेवण्याचा महाराष्ट्राचा वारसा आहे, आणि लोकशाहीत विरोधकांच्या मताचाही सन्मान ठेवला गेला पाहिजे. मेधा पाटकर यांना सुपारीबाज आंदोलक म्हणणाऱ्या अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. - रवींद्र आंबेकर



Tags:    

Similar News