शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्या तिघाडी सरकारला जनता जागा दाखवेल: चित्रा वाघ
लखीमपूर येथील हिंसाचाऱ्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून बंदला विरोध होत असून,राज्य सरकारवर टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुध्दा बंदवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्या तिघाडी सरकारला जनता जागा दाखवेल,असा खोचक टोला वाघ यांनी लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की,
"सत्ताधाऱ्यांनी बंद पुकारला आहे की महाराष्ट्राला वेठीस धरलं आहे ?? बाजार पेठांचे नुकसान बेस्टची तोडफोड सामान्य नागरिकांची वाहतुकीसाठी गैरसोय...शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या तिघाडी सरकारला जनता नक्कीच जागा दाखवेल,"अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी बंद पुकारला आहे की महाराष्ट्राला वेठीस धरलं आहे ??
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 11, 2021
बाजार पेठांचे नुकसान बेस्टची तोडफोड सामान्य नागरिकांची वाहतुकीसाठी गैरसोय...
शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या तिघाडी सरकारला जनता नक्कीच जागा दाखवेल #निषेध #Nomaharashtraband pic.twitter.com/g86kDN8frQ
तर पुढे बोलतांनी त्या म्हणाल्या की, "आज जेवढी ताकत लाऊन हे सरकार राज्यातल्या जनतेला बंद पाळायला भाग पाडत आहे.
त्याच्या निम्मी ताकत जरी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी लावली असती तरी महाराष्ट्रातल्या महिला मुली सुरक्षित असत्या,असेही चित्रा वाघ म्हणाल्यात.