आज वसुली सुरू आहे का?; महाराष्ट्र बंदवरून अमृता फडणवीसांची टीका

Update: 2021-10-11 10:41 GMT
आज वसुली सुरू आहे का?; महाराष्ट्र बंदवरून अमृता फडणवीसांची टीका
  • whatsapp icon

लखीमपूर येथील हिंसाचाऱ्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बंदवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आज वसुली चालू आहे की बंद?,असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

अमृता फडणवीस नेहमीच ठाकरे समाचार घेतांना खोचक वक्तव्य करतात.आज पुकारण्यात आलेल्या बंदवरून सुद्धा त्यांनी असेच काही वक्तव्य करत टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करता म्हंटले आहे की, "आज वसुली सुरू आहे का?,याबाबत मला कुणी अपडेट करेल का? असा टोला त्यांनी लगावला आहे.


Tags:    

Similar News