भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत १३ महिलांना तिकीट

Update: 2024-10-20 15:04 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, १३ महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.


भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. चिखलीमधून श्वेता महाले यांना तिकीट जाहीर झालं आहे. तर भोकर येथून क्षीजया चव्हाण, मेघना बोर्डीकर यांना जिंतूर, अनुराधा चव्हाण यांना फुलंब्री, सीमाताई हिरे यांना नाशिक पश्चिम, सुलभा कालु गायकवाड यांना कल्याण पूर्व, मंदा म्हात्रे यांना बेलापूर, मनीषा चौधरी यांना दहिसर, विद्या ठाकूर यांना गोरेगाव, माधुरी मिसाळ यांना पर्वती, मोनिका राजले यांना शेवगाव, प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा, मनिता मूंदडा यांना कैजमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Tags:    

Similar News