Bihar election results : लंडन टू बिहार, थेट मुख्यमंत्री पदाच्या दावेदार पुष्पम प्रिया चौधरी पिछाडीवर

Update: 2020-11-10 11:30 GMT

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत थेट एन्ट्री घेत मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी यांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पुष्पम प्रिया यांनी बांकीपूर आणि बिस्फी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून या दोन्ही मतदारसंघांमध्ये पुष्पम प्रिया पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

पाटण्याच्या बांकीपुरमध्ये पुष्पम प्रिया यांच्यासमोर शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा आणि भाजपाकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितिन नवीन यांचे आव्हान आहे. नितिन नवीन यांचे वडिल किशोर सिन्हा यांनी सुद्धा बांकीपुरमधून आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. पुष्पम प्रिया जेडीयूचे विधानपरिषदेतील माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी आहे. बांकीपुरमध्ये नितिन नवीन आघाडीवर आहेत. त्याखालोखाल लव सिन्हा दुसऱ्या स्थानावर आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र संपूर्ण निकाल हाती यायला वेळ लागणार असण्याची शक्यता आहे. कारण कोरोनामुळं Bihar Election साठी मतगणना केंद्रांची संख्या यावेळी वाढवण्यात आली आहे. बिहारच्या संपूर्ण निकालासोबत काही खास जागांच्या निकालाकडं देशाचं लक्ष लागून आहे.

Tags:    

Similar News