बीडच्या परीचारीकेवर बलात्कार,पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ: चित्रा वाघ
बीड जिल्हयात महिलांवर लैंगिक अत्याचार आणि अपहरणच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याहेत, मात्र पोलिस गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, मी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एक परिचारिका भेटली होती, तिच्यावर बलात्कार झाला आहे. मात्र शिवाजीनगर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसून, उलट मुलीला घाणेरड्या भाषेत पोलिसांकडून शिवीगाळ करण्यात येत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
बीड पोलिसांवर चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले असून, बीड पोलीसांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश लागू नाही का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे. तसेच याप्रकरणी आपण लवकरच पोलीस महानिरीक्षक आणि गृहमंत्री यांना भेटणार असल्याचं सुद्धा चित्रा वाघ म्हणल्यात.