बंडखोर यामिनी जाधव उभ्या राहताच 'ED-ED' अशा घोषणा..

Update: 2022-07-03 07:54 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाचे नवे सरकार स्थापन झाले. या सरकारने विधिमंडळात पहिला मोठा विजय मिळवला आहे. दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप शिंदे गटातर्फे असलेले उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.

भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. सभागृहात हेड काउन्ट चालू असताना शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या यामिनी यशवंत जाधव यांच्या नंबर येताच विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांनी 'ED-ED' अशी घोषणाबाजी केली. यामिनी जाधव यांनी भाजपचे-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने आपलं मत नोंदवलं. ज्यावेळी त्यांचं मत नोंदवण्याचा क्रमांक आला त्यावेळी विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली.

या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पौळ पाटील यांनी "कसं जमतं हो तुम्हाला हे दुतोंडी व ढोंगीपणाचा वागणं?" असे म्हणत यामिनी जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. काय म्हंटल आहे त्यांनी ट्विट मध्ये पाहुयात, "शिवसेना सोडून बाकी इतर पक्षाचा यामिनी जाधव, यामिनी जाधव यांनी केला नाही, यामिनी जाधव आणि यशवंत जाधव हे शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बेईमानी कधीही करणार नाहीत", अशा अनेक गोष्टी व्हिडिओ मार्फत केल्या होत्या पण आज विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांनी शिवसेना विरुद्ध मतमोजणी नोंदवली. "आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, यापुढेही शिवसैनिक म्हणूनच राहणार आहोत किंबहुना हे जग सुद्धा आम्ही शिवसैनिक म्हणूनच सोडणार आहोत" असे म्हणणाऱ्या बंडखोर आमदार यामिनी यशवंत जाधव ह्या आज #ED चा जयघोष करताना दिसल्या, कसं जमतं हो तुम्हाला हे दुतोंडी व ढोंगीपणाचं वागणं?

काशी पार पडली अध्यक्षपदाची निवडणूक -

भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पार्टीचे २ आमदार आणि MIM च्या एका आमदाराने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तसेच मनसेचे आमदार राजू पाटील भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या ३ आमदारांनी भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला. भाजपचे १०६ आमदार असले तरी आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यावेळी गैरहजर होते. या दोघांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत अँम्ब्युलन्समधून येऊन मतदान केले होते. दरम्यान शिवसेनेने व्हीप बजावलेला असताना त्यांच्या आमदारांना पक्षादेशाविरोधात मतदान केल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यासंदर्भातले पत्र वाचून दाखवले आणि हा मुद्दा रेकॉर्डवर घेतल्याचे सांगण्यात आले.

Tags:    

Similar News