उत्तर प्रदेश निवडणुकी बिकिनी गर्लच काय झालं?

Update: 2022-03-11 05:38 GMT

देशात काल पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले. खरतर यामध्ये अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. आणि कालच्या निकालामध्ये अनेक दिग्गजांना हार देखील स्वीकारावी लागली. या सगळ्या दिग्गज नेत्यांमध्ये आणखी एका नावाची चर्चा मोठी होती ते नाव म्हणजे bikini girl अर्चना गौतम. आता तुम्ही म्हणाल बिकिनी गर्ल हे विशेषण यांना लावलं जात आहे हा काय नक्की प्रकार आहे?

तर अर्चना गौतम या सिनेअभिनेत्री आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी त्या उमेदवार होत्या. खरतर काँग्रेस कडून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बिकिनी गर्ल जोरदार चर्चेत आल्या. काँग्रेस पक्षाकडून त्यांना मेरठ येथील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. अर्चना या 26 वर्षांच्या आहेत आणि त्या 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश सुद्धा ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मिस बिकिनी इंडिया आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धा सुद्धा त्या जिंकल्या होत्या त्यामुळे त्यांची ओळख टेक्निकल अशी सर्वदूर झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख बिकिनी गर्ल अशी प्रचलित झाली होती.




काँग्रेसने या अभिनेत्रीला तिकीट जाहीर केल्यानंतर या बिकिनी गर्ल आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना होता. आणि त्यानंतर त्या मोठ्या चर्चेत देखील आल्या. आता काल पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिकिनी गर्लची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत अर्चना गौतम (Archana Gautam)यांचे काय झालं असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर राजकारणात नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अर्चना गौतम यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. त्यांना चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधी उमेदवार भाजप नेते दिनेश खाटीक यांनी मोठी आघाडी घेत याठिकाणी विजयी मिळवला आहे.




 


Tags:    

Similar News