उत्तर प्रदेशच्या दिग्गज राजकीय कुटुंबात मोठी फुट, संध्या यादव भाजपमध्ये
उत्तर प्रदेशच्या दिग्गज राजकीय कुटुंबात मोठी फुट, संध्या यादव भाजपमध्ये, कोण आहेत संध्या यादव? वाचा
उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी चे नेते मुलायम सिंह यादव यांच्या कुटूंबात पुन्हा एकदा फुट पडली आहे. मुलायम सिंह यादव यांचे मोठे भाऊ अभय राम यादव यांच्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या मुलीचं नाव संध्या यादव असून त्या भाजपच्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढत आहे.
संध्या यादव जिल्हापरिषद अध्यक्ष राहिलेल्या आहेत. मैनपुरी घिरूर मधील वॉर्ड क्रमांक 18 मधून त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. संध्या यादव यांच्या भाजप प्रवेशाने यादव कुटुंबात फुट पडल्याची चर्चा आहे.