कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारतो. यावर त्या उत्तर देतात की, "उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला." आता अमृता फडणवीस यांनी असं म्हंटल्यानंतर समाजमाध्यमांवर अमृता फडणवीस यांची एकच चर्चा सुरु झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच अगदी बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या याच बिनधास्तपणे बोलण्याने त्यांना समाजमाध्यमांवर अनेक वेळा ट्रोल देखील केलं जातं. पण या ट्रॉलर्सना कसल्याच प्रकारे न जुमानता त्या नेहमी आपली भूमिका मांडत असतात.
आता सुद्धा अमृता फडणवीस या एक वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्या एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत या कार्यक्रमात त्यांना कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारतो. यावर त्या उत्तर देतात की, "उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला." असं उत्तर दिले त्यानंतर आता शिवसेनेच्या अनेक लोकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होतं आहे.
या कार्यक्रमांत अमृता फडणवीस यांना साध्य राज्यात सुरु असलेल्या राजकीय घटनांपासून ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश विचारण्यात आले आहेत. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी तसेच अनेक सिने कलाकार हजेरी लावत आहेत. अभिनेता सुबोध भावे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस साह्भागी झाल्या होत्या.