''देवेंद्र फडणवीस मला देखील कधीही सोडू शकतात..'' - अमृता फडणवीस

‘देवेंद्र फडणवीस मला देखील कधीही सोडू शकतात व ते राजकारण सोडून समाजकारण सुद्धा करू शकतात.’ अमृता फडणवीस यांच्या मोठा गौप्यस्फोट.;

Update: 2022-07-06 11:58 GMT

देवेंद्र फडणवीस कुठल्याही पदावर असले तरीही ते फक्त जनतेची सेवा करत राहतात. महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय परिस्थिती पाहता ते पुन्हा येतील असं मला वाटत होतं. देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री बनणार नाहीत व कुठलंही पद स्वीकारणार नाहीत हे मला थोडं आधीपासूनच माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे आता सर्वांनाच समजलं आहे. ते मलाही कधी पण सोडू शकतात व राजकारण सोडून समाजकारण सुद्धा करू शकतात. आणि याची जाणीव आज लोकांना सुद्धा झाली आहे. त्यामुळेच त्यांना लोकांनी इतकं प्रेम दिला आहे. असं अमृता फडणवीस यांनी काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मागच्या दीड वर्षात अनेक वेळा रात्री भेटायचे याविषयी तुम्हाला माहित होतं का? असा प्रश्न विचारल्या नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस रात्री हुडी, गॉगल मलाही ओळखणार नाही असे वेशांतर करून बाहेर पडायचे. असं देखिल त्या म्हणाल्या.

राज्याच्या राजकारणात इतक्या महत्त्वाच्या घडामोडी होत असताना नेहमीच समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या अमृता फडणवीस या मात्र मागच्या अनेक दिवसांपासून शांत होत्या. त्या कुठेही दिसल्या नाहीत किंवा त्यांनी याविषयी काहीही भाष्य केलं नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्या नक्की शांत का आहेत? असा प्रश्न आता समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात होता. राज्याच्या राजकारणात कुठलीही महत्त्वाची घडामोड घडली तर अमृता फडणवीस त्यावर लगेच व्यक्त होतात. त्या ट्विटर, फेसबुक या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. मात्र मागच्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मात्र अमृता फडणवीस यांनी मौन धरले आहे. काही ट्विट त्यांनी केले पण त्या राजकीय घडामोडींवर काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी काही वेळा राजकीय घडामोडींवर व्यक्त होण्याचा प्रयत्न केला त्या एकदा ट्विटर च्या माध्यमातून व्यक्त ही झाल्या. मात्र त्यांनी काही मिनिटातच ते ट्विट त्यांनी डिलिट केलं. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे ट्विट केले. माञ इतर वेळी त्या ज्या प्रकारे त्या व्यक्त होतात त्या प्रकारे त्या व्यक्त होताना दिसल्या नाहीत. मात्र काल त्या फडणवीस यांच्या स्वागत रॅलीत देखील सहभागी झाल्या व त्यानंतर त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देखील दिली त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे.

Tags:    

Similar News