''पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा..'' मंगळसूत्राबाबत अमृता फडणवीसांनी बिनधास्तपणे व्यक्त केली भूमिका

Update: 2022-08-04 15:00 GMT

"मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिक असते. त्यामुळे आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात धरला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या हातात मंगळसूत्र घालायला लागली." असं मजेशीर उत्तर अमृता फडणवीस यांनी नुकतंच एका टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दिले आहे. त्यांनी दिलेल्या याच उत्तरराची सर्वत्र चर्चा आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच अगदी बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या याच बिनधास्तपणे बोलण्याने त्यांना समाजमाध्यमांवर अनेक वेळा ट्रोल देखील केलं जातं. पण या ट्रॉलर्सना कसल्याच प्रकारे न जुमानता त्या नेहमी आपली भूमिका मांडत असतात.

आता सुद्धा अमृता फडणवीस या एक वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्या एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत या कार्यक्रमात त्यांना 'तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाही तर तुम्हाला सासूबाई ओरडत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी अत्यंत मजेशी उत्तर दिले आहे त्यांनी म्हंटल आहे की, "मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिक असते. त्यामुळे आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात धरला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या हातात मंगळसूत्र घालायला लागली. आता त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर निवेदक सुबोध भावे यांच्यासह प्रेक्षकांच्यात एकच हशा पिकाला.

या कार्यक्रमांत अमृता फडणवीस यांना साध्य राज्यात सुरु असलेल्या राजकीय घटनांपासून ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश विचारण्यात आले आहेत. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी तसेच अनेक सिने कलाकार हजेरी लावत आहेत. अभिनेता सुबोध भावे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस साह्भागी झाल्या होत्या.

Tags:    

Similar News