अमृता फडणवीस यांना आधीच माहीत होते की, देवेंद्र फडणवीस..

Update: 2022-07-01 14:37 GMT

राज्याच्या राजकारणात इतक्या महत्त्वाच्या घडामोडी होत असताना नेहमीच समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस शांत का? असा प्रश्न आता समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे. राज्याच्या राजकारणात कुठलीही महत्त्वाची घडामोड घडली तर अमृता फडणवीस त्यावर लगेच व्यक्त होतात. त्या ट्विटर, फेसबुक या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. मात्र मागच्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मात्र अमृता फडणवीस यांनी मौन धरले आहे. सद्या त्या लंडन मध्ये आहेत. पण त्यांनी काल शपथविधी झाल्यावर एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करतं नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल संध्याकाळी शपथ घेतली. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले होते. या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे गुवाहाटी वरून काल गोव्याला आणि गोव्यावरून थेट ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा देत असून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीर केल्यानंतर खरंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला आणि यावेळी देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार असाच विश्वास सर्व भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये होता. पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून लांब राहावे लागले. खरंतर या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे सर्वत्र म्हटल आहे. मात्र पक्षसृष्टींनी यात दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

इतकं सगळं घडत असताना अमृता फडणवीस मात्र सध्या लंडनमध्ये आहेत. प्रत्येक राजकीय गोष्टीवर समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या अमृता फडणवीस या सगळ्या राजकीय नाट्यावर मात्र शांत होत्या. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार नाहीत हे अमृता फडणवीस यांना आधीच माहीत होतं त्यामुळेच त्यांनी या सगळ्या गोष्टींवर काहीही भाष्य केलं नाही. असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.




 


Tags:    

Similar News