सर्व व्यवहार सुरु आहेत मग MPSC च्या परिक्षाच का नाही?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला सरकारला जाब

Update: 2021-03-11 12:30 GMT

राज्य सरकार MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या निर्णयाविरोधात राज्यभरातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरुन उतरून विरोध केला आहे. पुण्यातून या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रीया दिली असून त्यांनी "महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. हा चुकीचा निर्णय आहे. त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे."

"सगळे व्यवसाय वगैरे चालू आहे मग परीक्षाच का रद्द केली आहे? अनेक मुल दिवस रात्र अभ्यास करतात, त्यामुळे विद्यार्थांचे नुकसान होणार आहे त्याचं बरोबर खेड्यापाड्यातील मुल पुण्यात व औरंगाबादमध्ये राहून अभ्यास करतात, आणि हि परीक्षा रद्द करून मुलांची सगळी मेहनत वाया जाऊ शकते आणि त्यांच्या समोर मोठ प्रश्न चिन्ह उभ झालं आहे." असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News