राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या सोबत काही आमदारांना घेत विद्यमान शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या काही वेळानंतर लगेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आठ सहकाऱ्यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये रायगडच्या आमदार अदिती तटकरे यांचा सुद्धा सहभाग. होता. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारमध्ये महिला मंत्री नाही म्हणून मोठी टीका झाली. महाराष्ट्रात भाजप हा सर्वात जास्त जवळपास १२ महिला आमदार असलेला पक्ष आहे, असं असलं तरी सुद्धा मंत्री म्हणून कुठल्याही महिलेला संधी मिळालेली नाही. त्यामुळे भाजपमधीलच अनेक महिलांची नावे मंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होती किंबहुना चर्चेमध्ये होती. पण अचानक परवा दिवशी अदिती तटकरे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर महिला आमदारांमध्ये मंत्रीपदावरून कुजबूज व नाराज असल्याची चर्चा सुरु झाली..
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील यामिनि जाधव, लता सोनवणे, मंजुळा गावीत व अपक्ष आमदार गीता जैन यापैकी कुणाचातरी मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते. पण आता तरी शिवसेना व भाजप मधील कोणत्याच महिलेला संधी मिळालेली नाही. त्यामुळे अदिती तटकरे यांना मंत्रिपद दिल्यानंतर भाजप-सेनेच्या महिला आमदार नाराज आहेत का? नाराज असतील तर पुढील मंत्रिमंडळात शिंदे सरकार अजून किती महिलांना संधी देणार पाहावं लागणार आहे...