सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सर्व नेते ,शरद पवार अजित पवार ,छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते . या कार्यक्रमात सुरुवातीलाच सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांनंतर मी बोलणं म्हणजे माझंही करेक्ट कार्यक्रम केला आहे असे मजेशीर विधान केले होते .
त्यांनतर त्यांच्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या कि ,"सगळं स्थिर असलं कि पवारसाहेब कंटाळतात संघर्ष हा पवारसाहेबांच्या गुण आहे ,सगळं चांगलं चाललं असेल तेंव्हा त्यांना कंटाळा येतो ,जेंव्हा काहीतरी आव्हान येतं तेंव्हा त्यांना जास्त मजा येते काम करायला "हा आहे तो विडिओ
आता हे विधान सध्याच्या परिस्थितीला लागू केले असता ,एक नवा संघर्ष पुन्हा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला करावा लागणार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेनी शिवसेना जिंकली आता अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या ३५ आमदारांनी सुद्धा राष्ट्रवादीतून फुटून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला नवीन एक उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड झाली आहे.