''मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेणार मग या मंत्र्यांना..'' अजित पवारांचं वक्तव्य आणि सभागृहात एकच गदारोळ
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. या अधिवेशनात विविध प्रश्न, मुद्दे उपस्थित करण्यात येत असून त्यावर चर्चा होत आहेत. आज सकाळ पासून देखील विविध मुद्यांवरून चर्चा झाली. जेव्हा अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर चर्चा सुरु झाली त्यावेळी सभागृहात गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही सभात्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर मग आशिष शेलार उभे राहिले त्यांनी विरोधकांना तर सुनावलेच पण यावेळी त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कौतुक केलं.
खरंतर अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांनावर लक्ष वेधण्यासाठी १०० हुन अधिक आमदारांनी हा प्रश्न केला होता. या प्रश्नावर बोलताना मंत्री लोढा यांनी या बाबत आम्ही सकारात्मक असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं उत्तर दिले. त्यानंतर अजित पवार उभे राहिले आणि मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री निर्णय घेणार मग या मंत्र्यांना काही अधिकारच राहणार नाहीत असं ते म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ सुरु झाला. नक्की काय घडलं पहा..