दोघात तिसरा : काही तासांत पतीची घटस्फोटाची नोटिस

भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने सौमित्र यांनी सुजाता यांना घटस्फोटाची नोटिस पाठवली आहे.;

Update: 2020-12-21 13:45 GMT

पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय लढाई आता कौटुंबिक लढाईचे रूप धारण करीत आहे. बंगालच्या विष्णूपूरचे खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मंडल खान सोमवारी सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. तृणमूलमध्ये सामील होताच कुटुंबात भांडणे सुरू झाली आहेत.

पश्चिम बंगाल मध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी वातावरण चांगलच तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. तृणमूलला गळती लागलेली असतानाच आता भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत.

Tags:    

Similar News